Menu Close

अखेर कायदा होणार !

उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश आणि आता कर्नाटक  या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची घोषणा केली आहे. हिंदूंच्या लक्षावधी कन्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्यानंतर का होईना, आता काही राज्यांत तरी त्यांना न्याय मिळण्याची पुसटशी चिन्हे निर्माण झाली आहेत. हिंदु जनजागृती समितीने १५ वर्षांपूर्वीच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जोरदार आवाज उठवून मोठी मोहीम चालू केली आणि त्याचे गांभीर्य जनतेला पटवून देण्यास आरंभ केला. हळूहळू अन्य हिंदुत्वनिष्ठही जागरूक झाले आणि पहाताa पहाता अशी सहस्रावधी नव्हे, तर लक्षावधी प्रकरणे देशात घडत असल्याचे उघड झाले. त्यामुळे हे नियोजनपूर्वक होते, हे कुणीही सहज ओळखू शकते.

केरळ न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’चे गांभीर्य सांगूनही ‘कुठे आहे ‘लव्ह जिहाद ?’ असे म्हणणारे लोकप्रतिनिधी या देशाला लाभले, हे दुर्दैव होते; परंतु ४ राज्ये आता सतर्क झाल्याने ‘लव्ह जिहाद’ किती गंभीर आहे, हे सिद्धच झाले आहे. यामुळे तथाकथित पुरोगाम्यांचीही दातखिळी बसायला चालना मिळेल, यात शंका नाही. इतक्या वर्षांत स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, प्राध्यापिका, नट्या कुणालाच ‘लव्ह जिहाद’ची घटना दिसली नव्हती का ? ‘ज्या गोष्टींचे कट उघडपणे मशिदींमध्ये शिजत होते, त्या गोष्टी अन्य पंथाच्या प्रतिष्ठितांना ठाऊक नव्हत्या’, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. प्रेमाच्या नावाखाली हिंदु मुलींच्या अब्रूचा उघडपणे बाजार मांडला गेला. इतकेच नव्हे, तर त्यांना आतंकवादी बनण्यासाठी पाठवण्यात आले. प्रेमाचा हा रंग गुलाबी नव्हता, तर लाल आणि हिरवा होता. आर्थिक, लैंगिक, शारीरिक आणि मानसिक छळ, धर्मपरिवर्तन, गोमांस भक्षण काय काय म्हणून या मुलींनी सोसले, याची कल्पनाही करवत नाही. हिंदुत्वनिष्ठांनी अनेक वर्षे अत्यंत तळमळीने आणि जिवाच्या आकांताने याविरोधात आवाज उठवला. या अनेक वर्षांच्या लढ्यात ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने अखेरचा दणदणीत घाव घातला आणि आता शेवटी या विरोधात कायदा करण्याची झालेली घोषणा हिंदूंच्या भळभळणार्‍या जखमा पुसणारी आहे. अर्थात् त्यामुळे हिंदु वंशविच्छेदाची आणि फसवलेल्या कन्यांची हानी भरून तर निघणार नाही; हिंदूंच्या इतिहासातील हे एक काळे पान आहे; पण कुठेतरी वरील राज्यांत तरी आगामी प्रकरणांना काही प्रमाणात थोपवण्यास साहाय्य होईल, असे म्हणता येईल. हिंदु राष्ट्रात हिंदु मुलींना फसवण्याचे धारिष्ट्य केले जाणार नाही; तोपर्यंत तरी हा दिलासा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *