Menu Close

बांगलादेशातील मंदिरांमध्ये झालेल्या तोडफोडींच्या घटनांकडे गांभीर्याने पहात आहोत ! – भारत सरकार

  • भारत सरकारने याविषयी बांगलादेशच्या सरकारवर दबाव निर्माण करून प्रत्येक मंदिराच्या आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगायला हवे ! जगातील हिंदूंमध्ये विश्‍वास निर्माण झाला पाहिजे की, भारत त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करतो ! तरच किमान हिंदूंसाठीतरी भारत ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’चे पालन करत आहे, हे लक्षात येईल !
  • देशातही हिंदूंच्या मंदिरांवर, त्यांच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात. त्याकडेही भारत सरकारने गांभीर्याने पाहून ती रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली : बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड केल्याच्या घटना  भारत फार गंभीरपणे घेत आहे, असे भारत शासनाने सांगितले आहे. बांगलादेशात १५ हून अधिक हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाल्याच्या घटना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी उघडकीस आणल्यानंतर भारत शासनाचा हा पहिलाच प्रतिसाद होता.

१. फेसबूक पोस्ट्सद्वारे इस्लामचा तथाकथित अनादर झाल्याचा आरोप करत तेथील धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमणे केली होती. या घटना समोर आल्यानंतर चौधरी यांनी केंद्र सरकारला मंदिरांची तोडफोड झाल्याचा प्रश्‍न बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारकडे उपस्थित करण्यास सांगितले होते.

२. बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तानुसार १ नोव्हेंबरला बांगलादेशातील ब्राह्मणबर्‍हिया जिल्ह्यात असलेल्या नासिरनगरमधील मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि हिंदु भागातील १०० हून अधिक घरे लुटण्यात आली. कित्येक घंटे चाललेल्या हिंसाचारानंतर हबीगंजमधील माधवपूरलगतच्या २ मंदिरांवरही आक्रमणे करण्यात आली. यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ६ जणांना अटक करण्यात आली. यानंतर नासिरनगर आणि पोलीस मुख्यालय येथे अर्धसैनिक दल अन् पोलीस यांना तैनात करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *