Menu Close

संशोधकांना फास्ट फूड सेवनाचे नवीन गंभीर दुष्परिणाम आढळले !

या संशोधनाची नोंद घेऊन भारत शासनाने फास्ट फूडवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी अपेक्षा आहे !

लंडन : जॉर्ज वाशिंग्टन विश्‍वविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात फास्ट फूडमध्ये असलेल्या रसायनांमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याने संपूर्ण समाजाचेच आरोग्य धोक्यात आले आहे, असे आढळून आले आहे. या फास्ट फूडमध्ये आढळणारे फॅलेट हे रसायन साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांना मऊ करण्यासाठी वापरण्यात येते; मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. त्यातील पुरुषांची प्रजनन शक्ती न्यून होणे हा एक महत्त्वाचा परिणाम आहे.

१. शरिरावर होणारे दुष्परिणाम मूलत: फास्ट फूडमधील अन्नपदार्थांनी होत नसून ते सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्रक्रियेमुळे होतात, असे संशोधनात आढळून आले. या संशोधनाचे निष्कर्ष राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.

२. या संशोधनासाठी वर्ष २००३ ते २०१० या कालावधीत सुमारे ९ सहस्र व्यक्तींच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचे सर्वेक्षण केले गेले. त्यातून ज्यांनी गेल्या २४ घंट्यांत फास्ट फूड सेवन केले असेल त्यांच्या लघवीची तपासणी केली असता त्यात अनैसर्गिक रसायनांची मात्रा इतर फास्ट फूड न सेवन केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक आढळून आली. त्यात फॅलेट रसायनाचे प्रमाण सर्वाधिक होते.

३. फास्ट फूडमधील रसायनांमुळे आरोग्यावर होणार्‍या गंभीर दुष्परिणामांचे प्रमाण प्रौढ व्यक्तींपेक्षा मुलांत अधिक होतात. औद्योगिक रसायनाच्या सेवनाने मुलांत अ‍ॅलर्जीचे रोग आढळून येतात. तसेच मुलांच्या वागणुकीतही नकारात्मकता, चिडचीडेपणा असे दोष आढळून आले आहेत.

आरोग्यास हानीकारक असलेले १२ खाद्यपदार्थ

यात पिझ्झा, चॉकलेट, क्रिस्प्स (कुरकुरे), कुकीज (घरगुती गोड बिस्किटे), आईसक्रीम, फ्रेंच फ्रायीज (बटाट्याच्या तळलेल्या चकत्या), चीज बर्गर, सोडा, केक, चीज बेकन (खारवलेले डुकराचे मांस), तळलेले चिकन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
(पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम जाणून आता भारतियांनी फास्ट फूडवर बहिष्कार टाकून भारतीय अन्नपदार्थ ग्रहण करावेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *