-
दोन मशिदी बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण
-
व्हिएन्ना येथे ६ ठिकाणी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
ऑस्ट्रियासारखा छोटासा देश एका आतंकवादी आक्रमणानंतर जिहादी आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करतो. दुसरीकडे गेली तीन दशके जिहादी आतकंवाद सोसत आलेला भारत देश ‘कथित धर्मनिरपेक्षता’ आणि ‘अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन’ या राष्ट्रघातकी राजकीय धोरणांच्या आहारी जाऊन हातावर हात धरून बसतो. हे थांबण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच एकमेव मार्ग आहे !
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : युरोपीय देश ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नामध्ये २ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर तेथील सरकारने कट्टर इस्लामी शिक्षण देणार्या मशिदींवर कठोर कारवाई करण्यास आरंभ केला आहे. सरकारने नुकत्याच दोन मशिदी बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
१. आतंकवादी आक्रमणात मारला गेलेला २० वर्षीय कुज्तिम फेजुलई नावाचा आतंकवादी ओट्टाक्रिंग शहरातील ‘मेलिट इब्राहिम मशिदी’त आणि मेडीइन क्षेत्रात असलेल्या ‘तेवहिद मशिदी’त जात असल्याचे समोर आल्यावर या दोन्ही मशिदींचे कसून अन्वेषण करण्यात आले. या मशिदीत कट्टर इस्लामचे शिक्षण दिले जात असल्याचे आणि तेथे आतंकवादी ये-जा करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने त्वरित कारवाई करत मशिदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
२. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहैमर या कारवाईच्या संदर्भात म्हणाले की, सरकार कट्टर इस्लामचे शिक्षण देणार्या अन्य मशिदींवरही कारवाई करणार आहे. ज्या मशिदींमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचत असेल, अशा सर्व मशिदी बंद केल्या जातील.
३. २ नोव्हेंबर या दिवशी व्हिएन्ना येथे झालेल्या आक्रमणात ४ लोकांची हत्या झाली होती, तर अनेक लोक घायाळ झाले होते. इस्लामिक स्टेटने या आक्रमणाचे दायित्व घेतले होते.
४. आतंकवादी आक्रमणानंतर आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांपैकी ७ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला असून ४ जण आतंकवादाच्या आरोपाखाली दोषी असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात