हिंदूंनो, १०० वर्षांपूर्वी झालेल्या खिलाफत चळवळीचा खरा इतिहास जाणून घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
जळगाव : खिलाफत चळवळीला २७ ऑक्टोबर २०२० या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली. खिलाफत चळवळीचे नाव देऊन त्या वेळी दंगली घडवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर देशामध्ये पुन्हा एकदा खिलाफत चळवळीसारखे वातावरण निर्माण व्हायला प्रारंभ झाला आहे. हे संभाव्य संकट ओळखून १०० वर्षांपूर्वी घडलेल्या खिलाफत चळवळीचा खरा इतिहास जाणून घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. समितीच्या वतीने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ प्रांतस्तरीय ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. जगातील सर्वाधिक युवक भारतभूमीत रहातात; पण त्यांच्यापासून खरा इतिहास लपवला गेला आहे. आजपर्यंत खिलाफत चळवळ ही केवळ स्वातंत्र्यासाठीची किंवा इंग्रजांच्या विरोधातील चळवळ असेच शिकवले गेले; पण खरा इतिहास वेगळा आहे.
२. २७ ऑक्टोबर १९२० या दिवशी केरळच्या मलबार प्रांतामध्ये दंगल (मोपला दंगल) झाली. त्यात अनेक हिंदूंना येथील मोपला धर्मांधांनी खिलाफत चळवळीच्या नावाखाली ठार मारले. त्या वेळी ब्रिटनने तुर्कस्थानमधून ‘खिलाफत’ म्हणजेच खलिफाचे राज्य संपुष्टात आणले होते; पण तत्कालीन अल्पसंख्यांकांना खलिफाचे राज्य हवे होते. यासाठीच या चळवळीचा प्रारंभ झाला. ही एक प्रकारची धार्मिक चळवळच होती.
३. या घटनेचे खरे स्वरूप लपवून त्याला ‘स्वातंत्र्य चळवळ’ म्हणून इतिहासात सांगितले गेले. अत्याचारी धर्मांधांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून निवृत्तीवेतन चालू करण्यात आले. ही भयंकर अशी खिलाफत चळवळ १०० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केरळमधील मलबार प्रांतामध्ये जोर धरू लागली आहे.
४. इस्लामिक स्टेटचे बहुतांश आतंकवादी हे केरळ येथील आहेत. मलबार जिल्ह्यामध्ये धर्मांध बहुसंख्य झाले असून ते स्वतंत्र मलबार प्रांताची मागणी करत आहेत. आंंतरराष्ट्रीय स्तरावरही आर्मेनिया आणि अझरबैजान यांचे जे युद्ध चालू आहे, ते म्हणजे ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामिक राष्ट्र्र यांच्यातील ध्रुवीकरण आहे.
५. सध्या भारताच्या सीमा सर्व बाजूंनी असुरक्षित आहेत. सैन्य देशातील नक्षलवाद, आतंकवाद आणि दंगली यांचा सामना करत आहे. हे सर्व पहाता आपण सर्वांनी संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्राच्या कार्यात कृतीशील होण्यासाठी ९५ जण उत्सुक
या मार्गदर्शनाला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ प्रांतातील स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमातील अनेक धर्मप्रेमी युवक-युवती उपस्थित होते. ‘मार्गदर्शनातून धर्मकार्यासाठी ऊर्जा मिळाली. आम्ही सर्वजण भगवंताला प्रार्थना करून प्रयत्नांना आरंभ करू’, असे उपस्थित युवक-युवतींनी सांगितले. या वेळी ९५ जणांनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात कृतीशील होण्याची इच्छा दर्शवली.