नवी मुंबई : ‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका शिवचरित्रकार ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी केली. ऐरोलीनाका चिंचपाडा गणेशनगर येथे ११ ते १८ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वेरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात १७ एप्रिल या दिवशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या हरिनाम सप्ताहाला ह.भ.प ज्ञानेश्वपर महाराज सुतार (सावर्डेकर)आळंदी आणि ह.भ.प. शिवाजी महाराज पूरी (कळवा) यांची उपस्थिती लाभली. सप्ताहामध्ये ज्ञानेश्वारी पारायण, काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, महाजागर इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. देवळेकर महाराज पुढे म्हणाले…..
१. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण कधी आत्मसात करणार ? सिंहाचा जबडा फाडण्याचे बळ अंगी असणार्याी शंभू राजांप्रमाणे धर्मासाठी कधी लढणार ? मावळे कधी बनणार ? हा अभ्यास हिंदूंनी सतत करावा.
२. आम्ही धर्मासाठी बोलू, देश आणि धर्म यांचा किंचितही अपमान आम्ही खपवून घेणार नाही.
३. चरखे चालवून आणि हवेत कबुतरे उडवून भारताला स्वातंत्र्य मिळालेले नाही. शस्त्र आणि रक्त यांच्या क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळाले.
४. छत्रपती शिवरायांकडे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही गुण होते. ‘धर्माचे पालन आणि पाखंड खंडण’ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग शिवरायांनी स्वत: जीवनात प्रत्यक्ष आत्मसात केला होता.
५. ओवैसी, नास्तिक, पुरोगामी हे सर्व ब्रिगेडी लोक हातात हात घालून चालत आहेत. यांचे एकमेव लक्ष हिंदु धर्माची हानी करणे, हे आहे.
ह भ.प. श्रीगुरु ज्ञानेश्व र महाराज (सावर्डेकर) यांनी सप्ताहामध्ये श्रीकृष्णाचे चरित्र सांगून अध्यात्माविषयी प्रबोधन केले. ज्ञानदेव सांप्रदायिक मंडळ आणि गणेशनगरमधील भाविकांनी एकजुटीने हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सागर थोरात, ह.भ.प. दत्ता जाधव, ह.भ.प. लक्ष्मण पांचाळ, ह.भ.प. खंडू शिंदे आणि ह.भ.प. विठ्ठल उतेकर यांनी परिश्रम घेतले. सप्ताहामध्ये नियमितपणे २५०-३०० भाविकांची उपस्थिती लाभली.
संसारी जीवनातून नियमित किमान १ घंटा तरी राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी द्यावा – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
महाराष्ट्र हा पुरोगाम्यांना नसून संत ज्ञानेश्वरर, संत तुकाराम आदी संतांचा आहे. लहान मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. धर्मशिक्षणाचा अभाव हे हिंदूंच्या दयनीय स्थितीचे कारण आहे. प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमधून शासनाने ज्ञानेश्वारी, भागवत यांचे शिक्षण द्यायला हवे. मनुष्य जन्म मोक्षप्राप्ती आणि राष्ट्र-धर्म कार्यासाठी झाला आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने संसारी जीवनातून नियमित किमान १ घंटा तरी राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी द्यावा, असे आवाहन सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. या हरिनाम सप्ताहामध्ये १८ एप्रिल या दिवशी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. सागर थोरात यांनी शाल आणि श्रीफळ देऊन श्री. अभय वर्तक यांचा सत्कार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात