मंदिर पाडून पुन्हा मशीद बांधण्याचा पुनरुच्चार !
- अयोध्येतील राममंदिराच्या निकालाला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘शोषित’ (विक्टिम) असल्याचा आव आणत हिंसेचे समर्थन करणार्या ट्वीट्सना ऊत !
- हिंदूंकडून चुकूनही काही खुट्ट झाले, तरी ‘भारतीय लोकशाहीची हत्या झाली’ असे बरळत आकाश-पाताळ एक केले जाते. #JusticeDemolished या ट्रेंडद्वारे तर थेट भारताची कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याची भाषा करण्यात आली. यावर सर्व धर्मनिरपेक्षतावादी जग शांत आहे, किंबहुना त्यांनाही तेच हवे आहे, असे म्हटल्यास वावगे वाटण्यासारखे काही नसावे !
- हिंदू श्रीरामजन्मभूमीवर मंदिर बांधत असले, तरी धर्मांधांकडून आज ५ शतकानंतरही त्याला धोका कायम आहे. हे पहाता मंदिराच्या सुरक्षेसाठी अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यासह धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
नवी देहली : ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिरावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत संबंधित भूमी ही रामजन्मभूमीच असल्याचे मान्य केले. ५ शतकांच्या हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश आले. ९ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या विरोधात ट्विटरवर #JusticeDemolished (न्यायाचा पाडाव) या हॅशटॅगने ट्रेंड करण्यात आला. या माध्यमातून हिंसेचे समर्थन करत धर्मांधांनी भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान केला.
हा ट्रेंड काही घंटे भारतात पहिल्या स्थानावर होता. यामध्ये लोकशाही, भारतीय न्यायव्यवस्था, शासनतंत्र आदींच्या विरोधात गरळओक करण्यात येत होती. तसेच सर्वोच्च न्यायालय हे भाजपच्या ताटाखालील मांजर असल्याची भाषा केली जात होती. या समवेतच ‘इन्शा अल्लाह बाबरी मस्जिद एक दिन बनाकर रहेंगे’, अशा प्रकारे हिंसेला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि ट्वीट्सही प्रसारित करण्यात येत होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात