Menu Close

बिलिव्हर्स चर्चवरील आयकर खात्याच्या धाडीत १४ कोटी ५० लक्ष रुपये जप्त !

  • चर्चच्या पाद्य्राकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

  • राष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून वृत्त दडपण्याचा प्रयत्न

  • हिंदूंच्या मंदिरांवर किंवा धार्मिक संस्थांमध्ये अपहार झाल्यावर सरकार लगेच त्याचे सरकारीकरण करते आणि स्वतःच्या नियंत्रणात घेते, तर आता हे चर्च सरकार कह्यात घेणार का कि येथे ढोंगी धर्मनिरपेक्षता दाखवणार ?
  • मंदिरांच्या पुजार्‍यांकडून चुकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असता, तर पोलिसांनी त्यांना कारागृहात टाकले असते, मात्र येथे पाद्य्रांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, हे लक्षात घ्या !
  • एवढी मोठी बातमी असतांना त्याची नोंद राष्ट्रीय पातळीवरील बहुतेक दैनिके आणि वृत्तवाहिन्या यांनी घेतलेली नाही; मात्र या ठिकाणी हिंदूंचे एखादे धार्मिक स्थळ किंवा संस्था असती, तर त्याला जागतिक प्रसिद्धी देऊन हिंदूंची अपकीर्ती करण्यात आली असती !

थिरुवल्ला (केरळ) : आयकर खात्याकडून येथील के.पी. योहानन यांच्या बिलिव्हर्स चर्चच्या कार्यालयावरील धाडसत्र ३ दिवसांनी म्हणजे ९ नोव्हेंबर या दिवशी पूर्ण झाले. या धाडीच्या वेळी आयकर अधिकार्‍यांनी चर्चचे बेहिशोबी १४ कोटी ५० लक्ष रुपये जप्त केले आहेत, असे वृत्त ‘मातृभूमी’ या केरळमधील दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

३०० कोटी रुपयांचे अपहार

या वृत्तात पुढे म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांमध्ये विदेशी साहाय्यनिधी म्हणून चर्चला ६ सहस्र कोटी रुपये मिळाल्याचे आयकर खात्याच्या धाडीच्या वेळी उघड झाले. विदेशातून मिळालेल्या देणग्या चर्चने ‘रियल इस्टेट’ (इमारती, भूमी यांची खरेदी-विक्री) आणि बांधकाम क्षेत्र यांमध्ये अवैधरित्या खर्च केल्याचेही उघड झाले आहे. चर्चच्या खात्यातून ३०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचेही आयकर खात्याला प्राथमिक तपासणीच्या वेळी आढळून आले.

पाद्य्राकडून ‘आयफोन’ नष्ट करण्याचा प्रयत्न !

पहिल्या दिवशीच्या धाडीत आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी बिलिव्हर्स चर्चचे प्रवक्ते पाद्री सिजो पंडापल्लील यांचा ‘आयफोन’ जप्त केला. या वेळी पाद्य्राने अधिकार्‍याकडून ‘आयफोन’ हिसकावून घेतला आणि तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

चर्चच्या महिला कर्मचार्‍याकडून ‘पेन ड्राईव्ह’ नष्ट करण्याचा प्रयत्न !

चर्चच्या एक महिला कर्मचार्‍याने या प्रकरणी अपहार केल्याच्या धारिका आदी माहिती असलेला ‘पेन ड्राईव्ह’ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु आयकर अधिकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिचा प्रयत्न विफल ठरला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *