-
देवतांची चित्रे असणार्या अंतर्वस्त्रे, पायपुसण्या आदींची विक्री
-
ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेंड
नवी देहली : साहित्यांची ऑनलाईन विक्री करणार्या अॅमेझॉनवरून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारी अंतर्वस्त्रे, पायपुसण्या, कमोड आदींच्या विरोधात आता हिंदूंनी पुन्हा अभियान राबवले आहे. या उत्पादनांची छायाचित्रे पोस्ट करत परदेशातील, तसेच भारतातील अनेक हिंदूंनी ‘अॅमेझॉनने ही उत्पादने विकणे तातडीने बंद करावीत’, अशी मागणी केली आहे. अनेकांनी अॅमेझॉनचे अॅप ‘अनइन्स्टॉल’ करण्याची मागणीही केल्याचे चित्र दिसत आहे.
ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेंड करत अॅमेझॉनवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अॅमेझॉनवर हिंदु संस्कृतीचा अवमान करणार्या गोष्टींची विक्री केली जात असल्याचा आरोप या ट्रेंडच्या माध्यमातून अनेकांनी केला आहे. हा हॅशटॅग वापरून ट्वीट करणार्यांमध्ये परदेशात असणार्या भारतियांचाही समावेश आहे. भारतामध्ये अशी उत्पादने विकली जात नसली, तरी जगातील इतर देशांमध्ये अशी उत्पादने विकून हिंदु संस्कृतीचा अवमान केला जात आहे, अशा ट्वीट्सही अनेकांनी केल्या आहेत.
अॅमेझॉनवरून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान !
अॅमेझॉनवर आता हिंदूंनी कायमस्वरूपी संपूर्ण बहिष्कार घालणेच याला योग्य उत्तर ठरणार आहे. असा संघटित विरोध हिंदू कधी दाखवणार, हाच खरा प्रश्न आहे !
अॅमेझॉनने यापूर्वीही अनेकवेळा अशाप्रकारे देवतांचा अवमान करणारी उत्पादने, साहित्य आदी त्यांच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवले होते. त्याला विरोधही करण्यात आला होता. त्यावेळी ‘अशा वस्तू यापुढे आमच्या माध्यमातून विकल्या जाणार नाहीत’, असे अॅमेझॉनने म्हटले होते; मात्र आता पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने अनेकांनी यासंदर्भात ट्विटरवरून विरोध केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात