#ThisDiwali_BoycottTanishq ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ४ थ्या स्थानावर !
मुंबई : काही आठवड्यांपूर्वी टाटा ग्रूपच्या ‘तनिष्क ज्वेलरी’ ब्रँडकडून करण्यात आलेल्या एका विज्ञापनातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले होते. मुसलमान कुटुंबामध्ये मुसलमानाची पत्नी असणार्या हिंदु तरुणीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यात दाखवण्यात आला होता. त्याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यावर हे विज्ञापन मागे घेत तनिष्ककडून क्षमायाचना करण्यात आली होती; मात्र त्यातही ‘त्यांच्या आस्थापनाच्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी विज्ञापन मागे घेत आहोत’, अशी मल्लीनाथी करण्यात आली होती. यातून हिंदूंना हिंसाचारी दाखवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदूंनी आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्क ज्वेलरीचा विरोध करण्यासाठी #ThisDiwali_BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेंड केला. १० नोव्हेंबर या दिवशी करण्यात आलेला हा ट्रेंड काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या स्थानावर पोचला. यातून धर्मप्रेमी हिंदूंनी ‘दिवाळीमध्ये तनिष्कच्या दुकानातून सोने आणि सोन्याचे दागिने विकत घेऊ नये’, असे हिंदूंना आवाहन केले आहे.
दुसरीकडे दिवाळीच्या निमित्ताने ‘तनिष्क ज्वेलरी’ने एक विज्ञापन प्रसिद्ध करत त्यामध्ये हिंदूंना ‘फटाके वाजवू नका’, अशा प्रकारे उपदेश करण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून केवळ ‘आम्हाला (हिंदूंनाच) उपदेशाचे डोस पाजत असल्या’चे म्हणत हिंदूंनी त्यास विरोध केला आहे. या समवेतच विज्ञापनात सहभागी झालेल्या महिलांनी टिकली, बांगड्या, मंगळसूत्र आदी हिंदु संस्कृतीतील श्रृंगारांना तिलांजली देत केवळ ‘तनिष्क’चे अलंकार धारण केलेले दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंना अप्रत्यक्षपणे हिंदु संस्कृतीपासून दूर नेण्याचाच प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा ट्विटर आदी सामाजिक माध्यमांत होत आहे. याचा ही #ThisDiwali_BoycottTanishq या ट्विटर ट्रेंडमध्ये विरोध करण्यात आला. ९ नोव्हेंबर या दिवशीही या व्हिडिओला विरोध वाढल्याने ‘तनिष्क ज्वेलरी’ने त्या व्हिडिओचे ट्वीट काढले (‘डिलीट’ केले).
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात