हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या चित्रपटावर हिंदुत्वनिष्ठांनी केले होते बहिष्काराचे आवाहन !
मुंबई : हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारा ‘लक्ष्मी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला नाही. सर्वच सामाजिक माध्यमांवरून नेटकर्यांनी या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. ‘हा पूर्ण चित्रपट पहाणे म्हणजे आव्हान आहे’, अशा शब्दांमध्ये नेटकर्यांनी या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक नेटकर्यांनी चित्रपटाची खिल्ली उडवणार्या ‘मीम्स’ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या आहेत.
‘कंचना’ या तामिळी चित्रपटाच्या कथानकावरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाला नाव देतांना मात्र काहीही संदर्भ नसलेले ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे आक्षेपार्ह नाव देण्यात आले. याला हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतर निर्मात्यांनी नावातील ‘बॉम्ब’ हा शब्द काढून केवळ ‘लक्ष्मी’ असे नाव ठेवले. निर्मात्यांनी केवळ नावामध्ये पालट केला; मात्र चित्रपटातील हिंदूंच्या भावना दुखावणारा आक्षेपार्ह भाग वगळला नाही. त्याचप्रमाणे ‘कंचना’ चित्रपटात अभिनेता हिंदू असतांना ‘लक्ष्मी’ चित्रपटात मात्र अभिनेत्याचे नाव ‘आसिफ’ आणि अभिनेत्री ब्राह्मण दाखवण्यात आली आहे. अभिनेता आणि अभिनेत्री यांनी घरातून पळून जाऊन विवाह केल्याचे दाखवून या चित्रपटात जाणीवपूर्वक ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात