Menu Close

तनिष्कचा उद्दामपणा !

भारतात सर्वांनाच ‘तनिष्क ज्वेलरी’ परिचित आहे. वैविध्यपूर्ण दागिन्यांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ‘तनिष्क ज्वेलरी’ आस्थापनाने हिंदुविरोधी भूमिका घेतल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या चर्चेत आले. नव्हे नव्हे, तर हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ‘तनिष्क’ने दीपावलीनिमित्त प्रदर्शित केलेल्या विज्ञापनात ‘दिवाळी कशी साजरी करावी ?’ याचे धडे हिंदूंना दिले आहेत. जणू काही हिंदूंना दिवाळी साजरी करण्याचे ज्ञानच नाही कि काय ? यामुळे समस्त हिंदूंनी संतप्त होऊन याविरोधात ‘#BoycottTanishq’ असा ‘ट्रेंड’ सामाजिक माध्यमांवर चालवला आणि ‘तनिष्क ज्वेलरी’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. भाजपचे कर्नाटक येथील आमदार ‘सी.टी. रवि यांनी ‘तनिष्कने स्वत:चा माल विकण्यावर लक्ष द्यावे. दिवाळी कशी साजरी करायची, ते शिकवू नये’, असे ‘ट्वीट’ केले. याच ‘तनिष्क ज्वेलरी’ने नवरात्रोत्सवाच्या कालावधीत सामाजिक समरसतेच्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित केले होते. तेव्हाही हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केला; पण त्याविषयी सरळ सरळ क्षमायाचना करण्याचेही सौहार्द तनिष्क ज्वेलरीने दाखवले नव्हते. उलट ‘कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेमुळे विज्ञापन मागे घेत आहोत’, असे स्पष्टीकरण देत हिंदूंच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार तनिष्कने केला होता. एवढी मोठी घटना घडूनही त्याविषयी खंत न वाटता तनिष्कने पुन्हा तीच घोडचूक केली. आता विरोध होण्यास प्रारंभ झाल्यावर तनिष्कने ते विज्ञापन सामाजिक संकेतस्थळावरून हटवले आहे.

हिंदुद्वेषी तनिष्क !

हिंदूंच्या सणांच्या वेळी मानवतावादी संदेश देऊ पहाणारे तनिष्क अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी अशी प्रबोधनात्मक विज्ञापने का बरे प्रसारित करत नाही ? बकरी ईदच्या दिवशी ‘गोहत्या करू नका’, ‘रक्ताचे पाट वाहू नका’, असा संदेश हे निधर्मीवादी का देत नाहीत ? ख्रिसमसच्या दिवशीही ‘झाडे कापून सण साजरा करू नका’, ‘दारू पिऊ नका’, असे तत्त्वज्ञान का पाजळत नाहीत ? अन्य धर्मियांच्या सणांच्या दिवशी ते कोणत्या बिळात जाऊन लपलेले असतात ? तनिष्कने हे लक्षात घ्यावे की, जर धार्मिक सणांविषयीचे ज्ञान द्यायचेच असेल, तर ते केवळ हिंदूंना नव्हे, तर सर्वच धर्मियांच्या सणांच्या निमित्ताने दिले पाहिजे. बरे या विज्ञापनात दिवाळी साजरी करण्याविषयी सल्लोपदेश देऊ पहाणार्‍यांनी मात्र हिंदु धर्माप्रमाणे किंवा किमान दीपावलीच्या निमित्ताने तरी सुसंगत असे आचरण कुठे केले आहे ? दिवाळी म्हणजे आतील आनंद असतो. या अभिनेत्रींच्या कपाळावर तर टिकली किंवा कुंकू यांचा ठावठिकाणाही नाही. कुठे कसली पूजा नाही, मिठाई नाही आणि पणत्या (विज्ञापनात पार्श्‍वभूमीच्या ठिकाणी चिनी दिवे लावलेले दिसत आहेत) किंवा रांगोळीही नाही. या सर्व गोष्टींविना दिवाळी कशी काय साजरी करणार ? दिवाळीत प्रत्येक हिंदु लक्ष्मीपूजन करतो. श्रीराम अयोध्येत परतले म्हणून त्रेतायुगात सर्वत्र दिवे लावून दीपावली साजरी केली गेली. या आणि अशा अनेक आध्यात्मिक संदर्भांचा तर विज्ञापनात नामोल्लेखही नाही. केवळ फटाक्यांचे एकच सूत्र मांडून काय उपयोग ? दागिने घालून मिरवले की, दिवाळी साजरी होत नसते. सामाजिक संदेश देण्यासाठी दागिने घालण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे तनिष्क दाखवू पहात असलेले दिवाळीचे तथाकथित गोंडस रूप जाणून हिंदूंनी वेळीच सतर्क व्हावे. दीपावली हा हिंदूंचा सण आहे. या सणाला धर्मनिरपेक्षतेचा रंग देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. वारंवार विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदूंच्याच धार्मिकतेवर बोट ठेवणार्‍या आणि हिंदूंच्या धर्मभावनांवर आक्रमण करणार्‍या तनिष्क ज्वेलरीच्या निषेधासाठी देश-विदेशातील हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तनिष्कचा हिंदुद्वेषी आणि कपटी हेतू हिंदूंनी वेळीच लक्षात घ्यायला हवा. हिंदुविरोधी भूमिका घेणार्‍या तनिष्कवर जर हिंदूंनी बहिष्कार घातला, तर त्याविषयी आश्‍चर्य वाटायला नको !

टाटा यांनी शहाणे व्हावे !

‘तनिष्क ज्वेलरी’ हे टाटा आस्थापनाच्या अंतर्गत येते. टाटा आस्थापनाची विचारसरणी हिंदुत्वनिष्ठ समजली जाते. असे असतांना ‘हिंदुद्वेष्ट्या विचारांचे समर्थन करू पहाणारे ‘तनिष्क ज्वेलरी’ हे आस्थापन टाटा यांच्या अभिमानाला छेद देत आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ते काय ? सद्यःस्थिती पहाता ‘तनिष्क हे धर्मनिरपेक्ष शक्तींच्या हातातील जणू बाहुले झाले आहे कि काय ?’, असा प्रश्‍न पडतो. भारतियांच्या मनात आतापर्यंत आदराचे स्थान असणार्‍या टाटा यांच्यावर आता तनिष्कमुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यांनीही ते करावे; कारण आता हिंदू सजग आणि सतर्क झाले आहेत. तनिष्कच्या कुरापती पहाता अनेक हिंदूंनी केवळ तनिष्कवरच नव्हे, तर टाटा आस्थापनाच्या उत्पादनांवरही बहिष्कार घालण्यास प्रारंभ केला आहे. हिंदूंनी एकदा ठरवले की, काहीही होऊ शकते. टाटा आस्थापनाने या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून तनिष्कलाही खडे बोल सुनवावेत, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

तनिष्कचे नवे विज्ञापन प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली; पण काही हिंदूंनी त्या विज्ञापनाचे समर्थनही केले. का तर म्हणे, त्या विज्ञापनात चुकीचे असे काय आहे ? अभिनेत्रींनी दिवाळीविषयी केलेले प्रबोधन योग्यच आहे. ‘दिवाळीच्या कालावधीत तरी जातीय सूत्रावरून वाद उकरू नका’, असेही काहींचे म्हणणे होते. प्रत्येक वेळी हिंदूंनीच पडती बाजू का घ्यावी आणि तीही सण-उत्सवांच्या संदर्भात ? हिंदु धर्म हा सर्वांत प्राचीन धर्म आहे. या धर्माने आपल्या सण-उत्सवांच्या माध्यमातून अनमोल देणगीच दिली आहे. अर्थात् धर्माचरण न करणार्‍या आणि धर्मशिक्षण न मिळालेल्या हिंदूंना याविषयी काय समजणार ? धर्माविषयी काडीमात्र ज्ञान किंवा धर्माभिमान नसणार्‍या हिंदूंमुळेच तनिष्कसारख्या आस्थापनांचे फावते. मग अशी आस्थापने धर्मनिरपेक्षतेचा अजेंडा हिंदूंवरच लादू पहातात आणि दुर्दैवाने हिंदु त्याला बळी पडतो. तनिष्कने पहिले हिंदुद्वेषी पाऊल उचलले, हिंदूंनी विरोध केला. दुसरे हिंदुद्वेषी पाऊल उचलले, तेव्हाही विरोध केला. आता पुन्हा जर तनिष्कने हिंदुविरोधी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, तर वैध मार्गाने उत्तर देण्यास हिंदू सक्षम आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *