निकिता तोमर हत्याकांड प्रकरण
सरकार आणि प्रशासन यांच्याकडे अशी मागणी का करावी लागते ?
फरीदाबाद (हरियाणा) : येथील वल्लभगडमध्ये २८ ऑक्टोबर या दिवशी २१ वर्षीय निकिता तोमरची धर्मांध तौसिफ याने गोळी मारून हत्या केली. ही केवळ हत्या नसून यामागे ‘लव्ह जिहाद’ची संकल्पना असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात समितीने नोएडा शहर दंडाधिकारी उमाशंकर सिंह यांना नुकतेच निवेदन दिले. या वेळी समितीचे सर्वश्री अरविंद गुप्ता, धर्मप्रेमी सुभाष त्यागी, हरिकृष्ण शर्मा, रजत वार्षणेय आणि सौ. संदीप मुंजाल आदी उपस्थित होते.