Menu Close

धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

महाराष्ट्रात लव्ह-जिहाद नाकारणार्‍यांना चपराक !

Love_jihad_M

नांदेड : येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. (हिंदु युवती धर्मांधांच्या आमिषाला बळी पडतात आणि आत्महत्या करतात. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच या घटनांना आळा बसेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या प्रकरणी त्या युवतीच्या आईने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साजिद खान याला अटक केली आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख सयफोद्दिन यांनी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,

१. १८ वर्षीय हिंदु युवतीशी आमिर खान अब्बास खान उपाख्य साजिद खान याने प्रेमसंबंध ठेवले होते.

२. त्याने तिच्यासमवेत काही बरे-वाईट केल्याने तिने आत्महत्या केली आहे.

३. या प्रकरणाचा तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक दिनेश काशीद हे करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *