इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचे क्रौर्य !
इस्लामसाठी लढणार्या इस्लामिक स्टेटच्या या अमानुष क्रौर्याविषयी जगातील एकाही इस्लामी राष्ट्राने किंवा इस्लामी संघटनेने याचा निषेध केलेला नाही, हे लक्षात घ्या !
मापुटो (मोझाम्बिक) : दक्षिण आफ्रिकेतील मोझाम्बिक या देशामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी एका फुटबॉल मैदानात ५० हून अधिक जणांचा शिरच्छेद करून त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे केल्याची घटना घडली आहे. यानंतर या आतंकवाद्यांनी गावातील महिलांचे अपहरण केले. आतंकवाद्यांनी येथील गावकर्यांच्या घरांना आगीही लावल्या. त्यातून पळून जात असतांना गावकर्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात