-
ऑस्ट्रियामध्ये एका इस्लामी आतंकवादी आक्रमणानंतरची उपाययोजना !
-
राजकीय इस्लामचा प्रसार करणार्यांना आजन्म कारागृहात डांबणार !
एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर पूर्वी श्रीलंकेने कठोर कारवाई चालू केली आणि आता ऑस्ट्रियाही त्याच पावलावर पाऊल टाकत आहे; मात्र गेली ३ दशके जिहादी आतंकवादाने पीडित असलेल्या आणि सहस्रो लोकांचा बळी जाऊ देणारा भारत अद्यापही निष्क्रीय असणे लज्जास्पद !
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : आम्ही राजकीय इस्लामला एक गुन्हा म्हणून घोषित करणार आहोत. यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करता येईल. जे आतंकवादी नाहीत; मात्र त्यांच्यात आतंकवादाची बिजे रोवण्याचे काम केले जाते, त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. यात दोषी सापडलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव डिसेंबर मासामध्ये संसदेत सादर करण्यात येईल.
दोन बाजूंनी आतंकवादावर कारवाई केली जाईल. एक थेट आतंकवाद्यांना लक्ष्य करणे आणि दुसरी त्यांना आतंकवादी होण्यासाठी प्रेरित करणार्या विचारसरणीवर आघात करणे, अशी माहिती ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी दिली आहे. येथे २ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ऑस्ट्रिया सरकारने या विरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच ऑस्ट्रियाने कट्टरतावादी मशिदींना बंद करण्याच्या प्रक्रियेला आरंभ केला आहे. इस्लामचा राजकीय वापर करणे आता गुन्हा ठरवण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात