हरियाणातील मुसलमानबहुल मेवातमध्ये सरकारी ‘डी.एड्.’ अभ्यासक्रमासाठी मुसलमानांना ५० टक्के आरक्षण
भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवातमधील बहुसंख्य मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न करावेत अन् त्यांना भाजप सरकारने सर्व प्रकारे साहाय्य करावे, असेही हिंदूंना वाटते !
मेवात (हरियाणा) : राज्यातील मुसलमानबहुल मेवात जिल्ह्यामध्ये एका दैनिकामध्ये एक विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे. ‘डी.एड्.’ (डिप्लोमा इन एज्युकेशन) या संदर्भातील अभ्यासक्रमाविषयी हे विज्ञापन असून मेवात विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यात एकूण ५० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यातील ५० टक्के म्हणजे २५ जागा मेव मुसलमान (बाटलेले राजपूत यांना ‘मेव मुसलमान’ म्हटले जाते.) महिला आणि तरुणी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हे विज्ञापन विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘मेवातमध्ये डी.एड्. प्रवेशासाठी ५० टक्के जागा मुसलमानांना आरक्षित ? मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे हे अती झाले ! बहुसंख्यकही अल्पसंख्यक असतात ? धर्मांतरित हिंदूंना धर्माच्या आधारावर आरक्षण आणि तेही भाजपच्या राज्यात ?’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
१. बंसल यांनी पुढे येथील नूंहच्या उपायुक्तांना प्रश्न विचारला आहे की, मेवात विकास मंडळ ‘मुसलमान विकास मंडळ’ आहे का ? केवळ आणि केवळ मुसलमानांचाच विकास ? हे विज्ञापन तुम्हाला राज्यघटनाविरोधी, अनैतिक आणि हिंदुद्रोही दिसत नाही का ? जिल्ह्यामध्ये आधीपासून हिंदू समाज पीडित असून त्याच्यावर हे आणखी एक सरकारी आक्रमण नाही का ?
२. याविषयी सरकारी अधिकार्याने सांगितले की, वर्ष २००५ पासून ही योजना चालू आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मेवात मागास असल्याने येथे हा नियम लावण्यात आला आहे. जिल्ह्याला मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी मेवात विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात