महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण
धर्मांध बालपणापासूनच किती क्रूर असतात, हे यावरून लक्षात येते !
बर्लिन (जर्मनी) : येथील उपनगर स्पँडाऊमधील ख्रिश्चियन मॉर्गनस्टर्न प्रायमरी शाळेतील एका ११ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. या विषयीचे वृत्त जर्मनीतील ‘डेर टॅगेसेपगेल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
१. फ्रान्मध्ये एका महाविद्यालयामध्ये महंमद पैगंबर यांच्या विषयीचे व्यंगचित्र दाखवणार्या शिक्षकाची एका धर्मांध विद्यार्थ्याने गळा चिरून हत्या केल्याच्या प्रकरणी या शाळेमध्ये शिक्षकाला श्रद्धांजली देण्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले होते. या मौनानंतर या विद्यार्थ्याने म्हटले की, पैगंबर यांचा अवमान करणार्यांना मारण्याची आम्हाला अनुमती आहे आणि ते योग्य आहे.
२. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी या मुलाच्या आईवडिलांना भेटण्यासाठी बोलावले, तेव्हा त्याच्या आईने म्हटले की, आमचा परिवार अशा प्रकारचा विचार करणारा कट्टरतावादी नाही. त्याने शाळेतच अन्य मुलाकडून हे शिकले असेल.
३. जेव्हा या विद्यार्थ्याला त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावण्याचा निरोप देण्यात आला होता, तेव्हा त्याने शिक्षकाला म्हटले की, जर माझे आईवडील आले नाहीत, तर मी तुमच्या समवेत तेच करीन, जसे पॅरिसमध्ये त्या विद्यार्थ्याने शिक्षकासमवेत केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात