हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : धर्मांधांकडून ‘हलाल’ जिहादद्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. ही अर्थव्यवस्था राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांसाठी अर्थपुरवठा करते म्हणजेच ती आतंकवादाला पोसते. हे प्रत्येक हिंदूने जाणून घेऊन ती मोडून काढण्यासाठी अन्य धर्मबांधवांनाही जागृत केले पाहिजे. या माध्यमातून हिंदूंचे प्रभावी संघटन झाल्यास हलाल जिहादचे षड्यंत्र मोडून काढणे शक्य आहे. सध्या ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यांसह अनेक प्रकारचे जिहाद रौद्ररूप धारण करत आहेत. याविरोधात आपण जागरूक असलेच पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान, ही काळाची आवश्यकता’ या विषयावर ९ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानासाठी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले,
१. गेल्या ७२ वर्षांच्या कालावधीत धर्मनिरपेक्ष लोकशाही सर्वच आघाड्यांवर अपयशी झाल्याचे समोर येत आहे. निकिता तोमरसारख्या तरुणीची दिवसा ढवळ्या धर्मांधाकडून हत्या होते आणि त्यावर प्रशासन अथवा नागरिक काहीच करू शकत नाहीत, यापेक्षा मोठे अपयश ते काय ?
२. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर केवळ देवधन, स्थावर मालमत्ता यांची लूट होते, असे नाही, तर सहस्रो वर्षांच्या धार्मिक परंपरा पालटून मनमानी पद्धतीने कारभार केला जातो. ज्यांची देवतांप्रती कोणतीही श्रद्धा नाही, अशांना सरकारी नोकर म्हणून देवालयात नेमण्यात येते. असे करून हिंदूंच्या आधारशीलाच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते हाणून पाडले पाहिजे.
३. राज्यघटनेत ४८ व्या अनुच्छेदात ‘गोवध बंदी’ असूनही आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते देशात गोवंश हत्या बंदीचा कायदा बनवू शकलेले नाहीत. दुसरीकडे अन्य धर्मीय त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा लाटण्यासह अन्य मागण्यांसाठी सरकारवर दबाव टाकून त्या मान्य करून घेतात.
४. आपल्यासमोर असलेल्या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून अशाच प्रकारे छोट्या छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत त्याचा विषय पोचवणे आवश्यक आहे.
व्याख्यानाच्या कालावधीत एका धर्मप्रेमीने विचारलेला प्रश्न
प्रश्न : गोरक्षणाची कृती करतांना यात काही हिंदूच धर्मविरोधी कृती करतात. त्यावर उपाय काय ?
उत्तर : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ही परिस्थिती उद्भवते. गोमातेला हिंदु धर्मात पवित्र का समजले जाते ? तिच्यात ३३ कोटी देवतांची शक्ती कशा प्रकारे सामावली आहे ? याचे ज्ञान नसल्याने काही हिंदूच गोरक्षणाच्या कार्याला विरोध करतात. त्यासाठी आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत हिंदु धर्माचे महत्त्व पोचवले पाहिजे. ते आपल्या प्रत्येकाचे दायित्व आहे.