Menu Close

आपत्काळात युवकांनी शौर्याची उपासना करून धर्मकार्यात सहभागी होणे आवश्यक : निरंजन चोडणकर

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

रत्नागिरी : अधर्माच्या राज्यात अन्याय वाढत असतांना छत्रपती शिवरायांनी कालमहात्म्यानुसार शौर्याची उपासना करून धर्माचे रक्षण केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही अनेक दुष्प्रवृत्तींनी समाज त्रासलेला आहे. त्यामुळे काळाची आवश्यकता म्हणून प्रत्येक युवक आणि युवती यांनी शौर्याची उपासना करून धर्मकार्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. निरंजन चोडणकर म्हणाले,

१. आपल्या रक्तात अन् नसानसांत शौर्य असून आता ते जागृत करण्याची आवश्यकता आहे.

२. आज जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. तिसरे महायुद्ध चालू झाल्यावर बाह्य कलहासमवेतच अंतर्गत युद्धसुद्धा चालू होईल आणि तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपल्यात शौर्य निर्माण होणे आवश्यक आहे.

३. शौर्यजागृती होण्यासाठी प्रत्येकाने स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

४. छत्रपतींच्या मावळ्यांसारखे शौर्य जागृत करण्यासाठी प्रशिक्षणाच्या शक्तीला भक्तीची जोड द्यायला हवी.

५. आज कलियुगात अधर्म बळावल्याने धर्माला ग्लानी आली आहे आणि ही ग्लानी दूर केली नाही, तर आपल्यावर खूप मोठी आपत्ती येऊ शकते. त्यामुळे ही ग्लानी दूर करण्याचे आद्यकर्तव्य युवाशक्तीचेच आहे.

६. या धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी आपण प्रतिदिन एक घंटा नामजप आणि एक ते दीड घंटा प्रशिक्षण सराव करूया अन् हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होऊया.

अभिप्राय : श्री. यश सोवनी – शौर्यजागृती करणे किती महत्त्वाचे आहे आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे मनावर बिंबले.

क्षणचित्र : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतेच येथील धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले होते. त्यातून प्रेरणा घेत जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी स्वत:चे मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना या व्याख्यानाला जोडून घेतले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *