Menu Close

राहुल गांधी यांच्याकडे विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही ! – बराक ओबामा

वॉशिंग्टन (अमेरिका) – राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहेत. ज्या विद्यार्थ्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला त्याच्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे; परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्रावीण्य मिळवण्याची उत्कटता नाही, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आत्मचरित्रात आपले मत व्यक्त केले आहे. ‘राहुल गांधी हे निराश आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे’ही ओबामा यांनी लिहिले आहे. ओबामा यांचं हे पुस्तक १७ नोव्हेंबर या दिवशी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात वर्ष २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.

१. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त ओबामा यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावाचाही पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, डॉ. सिंह आणि अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा अन् प्रामाणिकपणा आहे.

२. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी ओबामा यांनी लिहिले आहे की, आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम इमॅन्युअल यांसारखे पुरुष देखणे असल्याचे सांगितले जाते; मात्र महिलांच्या सौंदर्याविषयी सांगितले जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणेच अपवाद आहेत, जशा की सोनिया गांधी.

३. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे यंत्र चालवणारे सशक्त आणि धूर्त प्रमुख आहेत, असेही ओबामा यांनी लिहिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *