वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या पूर्वी चिनी आस्थापनांवर अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चीनच्या सैन्याशी संबंधित कुठलेही चिनी आस्थापन अमेरिकेमध्ये गुंतवणूक करू शकत नाही.
Trump has signed an executive order banning Americans from investing in firms the administration says are owned or controlled by the Chinese military https://t.co/OFkPG8o7KO
— CNN Breaking News (@cnnbrk) November 12, 2020
अशा ३१ आस्थापनांना अमेरिकेने चिनी सैन्याशी संबंधित असल्याचे घोषित करून त्यांना गुंतवणूक करण्यावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीनची आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. हा आदेश पुढील वर्षी ११ जानेवारीपासून लागू होणार आहे. २० जानेवारी या दिवशी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शपथविधी घेऊन पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचे सरकार आल्यावर हा आदेश कायम राहील कि तो रहित केला जाईल, हे पहावे लागणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात