Menu Close

१६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 ८ मासांनंतर भाविकांना मंदिरात जाता येणार !

मुंबई : दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत, असा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला.

याविषयी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,

१. दिवाळीचे मंगलपर्व चालू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला आहे. नरकासुररूपी चिराटी फोडली असली, तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला, तरी बेसावध राहून चालणार नाही.

२. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडल्यावरही भाविकांना कोरोनाच्या नियमांचे म्हणजेच मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे लागणार आहे. मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे येथे गर्दी करणे टाळा अन् स्वतःसमवेत इतरांचेही रक्षण करा.

३. महाराष्ट्रावर साधू-संत, देवता यांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त अन् सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारी झाली नाही. इतकेच नाही, तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीची जत्रा या वेळी शिस्त पाळली आहे.

४. कोरोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली, तरी आधुनिक वैद्य, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या माध्यमातून देव पांढर्‍या कपड्यांमध्ये भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होता.

५. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडणे, हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ची इच्छा समजावी.

६. चपला बाहेर काढून मंदिरात प्रवेश करायचा असतो; पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. आपण शिस्त पाळली, तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला मिळतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Tags : Pro-Hindu

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *