Menu Close

इस्रायलने इराणच्या राजधानीमध्ये घुसून अल् कायदाच्या दुसर्‍या क्रमांकाच्या प्रमुखाला केले ठार

लादेनची सूनही ठार

छोटासा इस्रायल असे करू शकतो, तर बलाढ्य भारत असे का करू शकत नाही ? पाकमधील आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत असे ठार का करत नाही ?, असे प्रश्‍न प्रत्येक भारतियाच्या मनात येणारच !

तेहरान (इराण) : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने इराणची राजधानी तेहरानमध्ये अल् कायदाचा दुसर्‍या क्रमांकाचा प्रमुख आतंकवादी अबू महंमद अल् मस्त्री याला ठार केले. त्याच्या समवेत लादेन याची सून मरियम हीसुद्धा यात ठार झाली.

या दोघांना रस्त्यावर गोळ्या घालून ठार करण्यात आले. वर्ष १९९८ मध्ये केनिया आणि टांझानिया येथे अमेरिकेच्या दूतावासांवर झालेल्या आक्रमणाचा अबू हा मुख्य सूत्रधार होता. या आक्रमणात २२४ लोकांचा मृत्यू झाला होता. अबू याची माहिती देणार्‍याला १ कोटी डॉलरचे (७४ कोटी रुपयांचे) बक्षिस ठेवण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *