- भारतातील किती हिंदू त्यांच्या पाल्यांना रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी सांगतात किंवा त्यांच्यावर तसे संस्कार करतात ?
- कालमहिम्यानुसार येणार्या काळात हिंदु धर्माचा जगभरात प्रसार होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी केलेले हे वक्तव्य त्याला पूरकच आहे !
वॉशिंग्टन (अमेरिका) : लहानपणी इंडोनेशियामध्ये असतांना हिंदु महाकाव्य रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो; म्हणून माझ्या मनात भारताविषयी कायमच एक विशेष स्थान राहिले आहे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ नावाच्या आत्मचरित्रात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी या पुस्तकात विधान केल्याचे समोर आले होते. ओबामा यांनी वर्ष २०१० मध्ये राष्ट्राध्यक्ष असतांना भारताचा दौरा केला होता. त्याआधी कधीच ते भारतात आले नव्हते.
Barack Obama spent childhood years listening to Ramayana and Mahabharata https://t.co/ZglujNP7fC via @TOIWorld pic.twitter.com/GjB7CN1NE1
— The Times Of India (@timesofindia) November 17, 2020
ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे की,
१. असे असू शकते की, भारताचा आकारच असा आहे की, जो आकर्षित करतो, जिथे जगातील लोकसंख्येचा सहावा भाग रहातो; जिथे जवळपास २ सहस्र वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक रहातात आणि जिथे ७०० हून अधिक भाषा बोलल्या जातात.
२. भारताविषयीच्या आवडीमागे असेही कारण असू शकते की, पूर्वेकडील धर्मांमध्ये माझी आवड असू शकते. महाविद्यालयामधील माझ्या पाकिस्तानी, तसेच भारतीय मित्रांचा समूह आहे ज्यांनी मला दाल आणि खिमा बनवायला शिकवला होता, तसेच मला हिंदी चित्रपट दाखवले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात