जगातील अनेक चर्चमधील पाद्रयांना महिला आणि लहान मुले यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणी दंड करण्यात आला असतांना आता पोप यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शंका कुणी उपस्थित केल्यास ती नाकारता कशी येईल ?
व्हॅटिकन सिटी : ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या अधिकृत ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर ब्राझिलच्या नतालिया गरिबोटो या मॉडेलच्या अर्धनग्न मादक छायाचित्राला ‘लाईक’ (पसंत) केल्यामुळे सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर पोप यांच्याकडून ते ‘अनलाईक’ (नापसंत) करण्यात आले.
(सौजन्य : Top Variety & Headlines Today)
१. याविषयी नतालिया गरिबोटो हिने म्हटले आहे की, माझ्या आईने हे छायाचित्र नाकारले होते; मात्र पोप यांना हे पसंत आल्याने कमीतकमी मी स्वर्गात जाईन.
२. हे छायाचित्र चुकून लाईक करण्यात आले कि जाणीवपूर्वक, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नतालियाचे इन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात