Menu Close

विवाहित मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे सांगत परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण !

गर्भवती झाल्यावर धर्मांतरासाठी केली मारहाण

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धर्म लपवून हिंदु असल्याचे सांगणार्‍या धर्मांधांना आजन्म कारावासात टाकणाराच कायदा आता केंद्र सरकारने केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

बागपत (उत्तरप्रदेश) : येथे एका खासगी रुग्णालयातील हिंदु परिचारिकेला मुसलमान डॉक्टर अक्रम याने त्याची खरी ओळख लपवून हिंदु असल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे ७ मास लैंगिक शोषण केले. यामुळे ती गर्भवती झाल्यावर तिला मुसलमान होण्यास सांगून विवाह करण्याची अट घातली. यामुळे या परिचारिकेने पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर अक्रमची पहिली पत्नी आणि भाऊ यांना अटक करण्यात आली.

(सौजन्य : News18 UP Uttarakhand)

पोलीस अक्रमचा शोध घेत आहेत. त्याने या परिचारिकेचा अश्‍लील व्हिडिओही बनवला आहे. जेव्हा ती विवाहाविषयी बोलते, तेव्हा तो तिला हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन गप्प करत होता. गर्भवती झाल्यावर अक्रमने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला आणि तिच्या पोटावर पाय मारला होता. (‘प्रेम करण्यासाठी आता धर्म पहायचा का ?’, असा प्रश्‍न विचारणारे अभिनेते झिशान अय्यूब या घटनेवर तोंड उघडतील का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *