अक्कलकोटच्या भाविकांचे पाणी मात्र रोखतात, हे त्यांना निवडून देणाऱ्या हिंदूंना लज्जास्पद !
- हक्काचे किमान पाणी देण्यास तहसीलदारांचा नकार !
- पाणीटंचाई अभावी गेल्या ८ दिवसांपासून यात्रीभुवन आणि यात्री निवास बंद !
- मद्य आस्थापनांचे पाणी रोखण्यास विरोध करणारे राज्यकर्ते
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) : येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे प्रतिदिन सहस्रो स्वामीभक्तांना विनामूल्य महाप्रसादाचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून अन्नछत्रातील ताटे बंद झाली आहेत आणि त्याजागी पत्रावळ्या आल्या आहेत. अर्थात दुष्काळामुळे ही वेळ आली असल्याचे खरे असले, तरी अक्कलकोटच्या तहसीलदारांनी अन्नछत्र मंडळाला किमान हक्काचे पाणी देण्यास नकार दिल्यानेच ही स्थिती ओढवल्याची गोष्टही प्रकाशात आली आहे. तहसीलदारांचे हे आडमुठे धोरण असेच राहिले, तर स्वामी दर्शनाला येणाऱ्याे सहस्रो भक्तांना महाप्रसादाविनाच घरी परतावे लागेल हेच खरे.
१. दुष्काळामुळे अन्नछत्र परिसरातील बोअरचे पाणी आटल्यामुळे संस्थानने २ वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून ८ किमी अंतरावरील बळोरगी येथे दीड एकर भूमी विकत घेतली आणि तेथे विहीर खोदली.
२. विहिरीला पुष्कळ पाणी लागले. विशेष जलवाहिनीद्वारे हे पाणी अन्नछत्र मंडळापर्यंत आणले गेले; पण भीषण पाणीटंचाईमुळे अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही विहीर अधिग्रहित केली. मंडळाचा या अधिग्रहणास काहीच आक्षेप नाही.
३. गेल्या चार मासांपासून या विहिरीतून प्रतिदिन चार लक्ष लिटर पाणी उपसा होतो आणि तो अक्कलकोट शहरास पुरवला जातो.
४. वास्तविक अन्नछत्रास प्रतिदिन यात्रीभुवन आणि यात्री निवास या निवासी इमारती आणि महाप्रसादगृहासाठी अडीच लक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे.
५. भीषण पाणीटंचाईचे भान आम्हाला आहे; पण शासनाने प्रतिदिन किमान दीड लक्ष लिटर्स पाणी अन्नछत्राला द्यावे, अशी मंडळाची मागणी आहे.
६. पाणीटंचाईअभावी गेल्या ८ दिवसांपासून यात्रीभुवन आणि यात्री निवास बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे परगावातून येणाऱ्या भक्तांची असुविधा होत आहे.
उपविभागीय अधिकारी श्रीमंत पातोळे यांचा आदेश धाब्यावर, तर जिल्हाधिकाऱ्यांसनी पातोळे यांना सुट्टीवर पाठवून केली कडी
मंडळाने अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांची अनेकदा भेट घेतली, निवेदने दिले; परंतु उपयोग शून्य झाला. अखेर मंडळाच्या समितीने उपविभागीय अधिकारी श्रीमंत पातोळे यांना निवेदन दिले. पातोळे यांनी समन्वयाची भूमिका घेऊन मंडळाच्या विहिरीतून प्रतिदिन किमान हक्काचे पाणी सोडण्याचे आदेश मरोड यांना दिले; पण तहसीलदार मरोड यांनी हे आदेश धाब्यावर बसवले, तर जिल्हाधिकारी मुंढे यांनी पातोळे यांना तातडीच्या सुट्टीवर पाठवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात