Menu Close

बेंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन

हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू (कर्नाटक) : आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे. प्रत्यक्षात भारताचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की, हिंदु धर्मानुसार आचरण करणार्‍या महापराक्रमी राजांच्या रक्तातील प्रत्येक कणांत शौर्य ठासून भरलेले आहे. त्या राजांनी शत्रूच्या सैन्याविरुद्ध लढून स्वतःचा पराक्रम गाजवलेला आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य इतके होते की, त्यांच्याकडे सैन्यबळ अल्प असूनही शत्रूंशी लढून त्यांनी इतिहास निर्माण केला. अशा पराक्रमी राजांचा आदर्श घेऊन हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. नुकतेच येथील धर्मप्रेमींसाठी समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ २०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

  • आम्ही आमचे मित्र आणि आमच्या कुटुंबियांना संपर्क करून धर्मकार्यात जोडणार आहोत.
  • धर्मकार्यासाठी आम्ही अल्प वेळ देत असून येथून पुढे आम्ही आणखी वेळ देऊ.
  • राष्ट्र, धर्म आणि लव्ह जिहाद यांसारखे विषय मी माझ्या मित्रांना माझे कर्तव्य म्हणून सांगीन.
  • इतिहासातील प्रसंग ऐकल्यानंतर आम्हाला किती जागरूक रहाणे आवश्यक आहे, याची जाणीव झाली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *