Menu Close

गयाना येथील हिंदु विद्यालयाची धर्माचरण करण्याची शिकवण !

कुठे आपली हिंदु ओळख टिकवण्यासाठी कटीबद्ध असणारे सातासमुद्रापलीकडील विद्यालय, तर कुठे निधर्मी शिक्षणपद्धती अवलंबणारी लक्षावधी भारतीय विद्यालये !

जॉर्जटाऊन (गयाना) : येथील पश्‍चिम किनारपट्टीपर असलेल्या डेमेरारा शहरातील सरस्वती विद्या निकेतन या हिंदु विद्यालयाचे ब्रिद वाक्य आहे – सत्यं वद । धर्मं चर अर्थात खरे बोला, धर्माचरण करा ! या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचे दिवाळी, रामनवमी, व्यास पौर्णिमा आणि ग्रीष्म या ४ भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. हे विद्यालय १५ मुख्य विषयांव्यतिरिक्त हिंदु संस्कृती, भरतनाट्यम्, कथ्थक आणि वेद हे विषयही शिकवते. या विद्यालयाची स्थापना वर्ष १९९८ मध्ये करण्यात आली होती.

स्वामी अक्षरानंद हे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासोबतच हे विद्यालय विद्यार्थ्यांना करुणा, निर्भयता, सत्य आणि क्षमाशीलता ही मानवी मूल्ये आत्मसात करायला शिकवते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *