Menu Close

राजभवनात मुसलमानांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी !

मुंबई – राजभवनातील मुसलमान कर्मचार्‍यांसाठी नमाजपठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. तिथे बाहेरील मुसलमानही नमाजपठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या निर्देशानुसार राजभवनातील प्रार्थनास्थळ अन्य प्रार्थनास्थळांप्रमाणे बंद झाले होते. त्यावर ‘रझा अकादमी’ या मुसलमान संघटनेकडून मुसलमानांंसाठी नमाजसाठी राजभवनातील ही मशीद खुली करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राजभवनात मुसलमानांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे, असे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की, 

राज्यघटनेप्रमाणे भारतीय शासन आणि प्रशासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे. ती सर्वधर्मसमभावाचे पालन करणारी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला झुकते माप देता येत नाही. राज्यघटनेत न्याय, बंधुता, समता आदी मूलभूत तत्त्वांचे पालन बंधनकारक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे राजभवनात मुसलमान कर्मचार्‍यांना एका मशिदीसाठी जागा देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर आणि नियमानुसार हिंदु कर्मचार्‍यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी. जेणेकरून राजभवनातील हिंदु कर्मचारी आणि बाहेरील हिंदू महाआरती, पूजा, उपासना, तसेच विविध धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करू शकतील. तसेच त्या जागेत जाऊन त्यांना नित्य उपासना करता येईल, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *