केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !
सरगुजा (छत्तीसगड) : येथील अंबिकापूरमधील मधुमती विश्वास या विवाहितेने तिचे पती अमित विश्वास तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी करत असल्याचे म्हटले आहे. या विषयी मधुमिता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याविषयीचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे. अमित विश्वास हे भोपाळ नगरपरिषदेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आहेत, तर मधुमिता विश्वास या व्यवसायाने होमियोपॅथी डॉक्टर आहेत. पीडितेच्या पहिल्या विवाहानंतर काही वर्षांत तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांनी अमित विश्वाससमवेत दुसरा विवाह केला.
छत्तीसगढ़ के सरगुजा जिले में एक पत्नी ने अपने पति पर धर्म परिवर्तन के लिए दबाव बनाने का आरोप लगाया है#Chhattisgarh #Islam https://t.co/9wzGD1ZwYl
— Zee News (@ZeeNews) November 28, 2020
१. मधुमिता यांनी सांगितले की, अमित यांनी इस्लामचा कधी स्वीकार केला, हे ठाऊक नाही; मात्र मुलीचे नाव मुसलमान धर्मातील ठेवण्याचे सांगितल्यावर हे समोर आले. तसेच तो इस्लामचा प्रसार करत असून मुलाचे नावही इस्लाममधील ठेवण्याची त्याची इच्छा आहे.
२. मधुमिता यांनी मुसलमान होण्यास नकार दिल्यापासून अमित यांच्याकडून त्यांचा छळ होत असल्याचे मधुमिता यांनी म्हटले आहे. मधुमिता यांना तनीश नावाचा १४ वर्षांचा मुलगा आहे.
३. अमित हे मधुमिता यांच्यावर घरात ठेवलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा हटवण्यासाठी दबाव आणत आहे. असे केले नाही; म्हणून अमित यांनी मधुमिता यांना मारहाण केली. १९ नोव्हेंबर २०२० या दिवशी घरातील गॅस पाइप लाईन कापून ठार मारण्याचाही प्रयत्न केला.
४. मधुमिता यांचा आरोप आहे की, अमित यांचे मुसलमान तरुणीसमवेत विवाहबाह्य संबंध आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात