साई संस्थानचा स्तुत्य निर्णय : अन्य मंदिरांनीही या निर्णयाचे अनुकरण करावे, ही अपेक्षा !
शिर्डी (जिल्हा नगर) : शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येत असल्याचे सध्या पहायला मिळत आहे. मंदिरात येणार्या भाविकांनी भारतीय वेशभूषेतच दर्शनासाठी यावे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे समजते. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली, तरीही त्यासंबंधीचे फलक मात्र येथे लावण्यात आले आहेत.
तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांपैकी काहीजण हे तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यापैकी काही भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय वेशभूषा करण्याची विनंतीही करण्यात आली. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात