कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे आणि अवैध पशूवधगृहे चालू असणे हिंदूंना अपेक्षित नाहीत ! पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारांवर आक्रमण होणे हे पोलिसांना लज्जास्पद !
हासन (कर्नाटक) : अवैधरित्या होणार्या गोहत्येचा विरोध करणार्या एका महिला पत्रकारावर धर्मांध कसायांनी आक्रमण केल्याची घटना येथील पेंशन मोहल्ला येथे घडली. ही महिला पत्रकार पशूप्रेमी आणि पोलीस यांच्यासह ४ अवैध पशूवधगृहे अन् गोवंश ठेवलेल्या ५ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती. येथे १०० हून अधिक गोवंश ठेवण्यात आले होते. ही अवैध पशूवधगृहे हसन बाबू आणि रहमान हे चालवत होते.
महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या वेळी त्यांचा विनयभंगही करण्यात आला. येथून निघून न गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांनी दिली. यामुळे येथील काही गोवंशांना वाचवण्यात यश आले, तर उर्वरित गोवंश कसायांकडून लपवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात