Menu Close

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

मुंबई : येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी काढलेली चित्रे विक्रीसाठी ठेवली होती.

याविषयी धर्मप्रेमींनी विरोध केल्यावर, तसेच हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन करणारे पत्र पाठवल्यानंतर या आस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र याविषयी धर्माभिमानी हिंदूंनी ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅप यांच्या माध्यमांतून वैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर या आस्थापनाने हुसेन यांची चित्रे विक्रीतून काढून टाकली आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *