Menu Close

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी PFI कडून लावण्यात आली प्रक्षोभक भित्तीपत्रके !

  • गोव्यातील हिंदूंनी संघटितपणे ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची मागणी करावी !

मडगाव : ६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरीचा ढाचा पाडण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेने रुमडामळ हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथे ‘बाबरी एक दिवस उभारली जाणार’, अशा आशयाची भित्तीपत्रके सार्वजनिक ठिकाणी लावली आहेत. विशेष म्हणजे राज्यात १२ डिसेंबर या दिवशी होऊ घातलेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतांना धार्मिक तेढ निर्माण करणारी ही पत्रके प्रदर्शित करण्यात आली आहेत. भित्तीपत्रके लावल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून फिरत असूनही याविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. (असे पोलीस काय कामाचे ? हिंदूंनी या विरोधात तक्रार करून मडगाव पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी का करू नये ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

फोंडा येथे पी.एफ्.आय.ची भित्तीपत्रके घेऊन निदर्शने आणि पोलीस निष्क्रीय !

फोंडा येथील दादा वैद्य चौकाजवळ ६ डिसेंबर या दिवशी सकाळी ‘बाबरी एक दिवस उभारली जाणार’, अशा आशयाची भित्तीपत्रके घेऊन निदर्शने करण्यात आली. (बाबरीविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही अशा प्रकारची भित्तीपत्रके घेऊन निदर्शने केली जातात आणि निदर्शनस्थळापासून २५ मीटर अंतरावरील फोंडा पोलीस याविषयी गप्प बसतात, हे दुर्दैवी ! अशा निदर्शनांतून धार्मिक तेढ निर्माण होत असतांना पोलीस गप्प कसे ? ते धर्मांधांना घाबरतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पी.एफ्.आय.चा बॉम्बस्फोट, दंगली, लव्ह जिहाद आदी अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना अन् यात सातत्य ठेवले जात असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ? असा प्रश्‍न हिंदूंना पडला आहे !

पाटलीपुत्र (बिहार) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने बिहारच्या कटहारी, पूर्णिया आणि दरभंगा येथील काही ठिकाणी बाबरी ढाचा पाडल्याच्या दिनानिमित्त आक्षेपार्ह भित्तीपत्रके लावली होती. यात लिहिले होते, ‘६ डिसेंबरला विसरू नका.’ यात बाबरी ढाच्याचे तीन घुमट दाखवण्यात आले होते. यानंतर बिहार पोलिसांनी राज्यात सतर्कतेची चेतावणी दिली होती.

(सौजन्य : The HD News)

काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने दरभंगा आणि पूर्णिया यांसहित देशातील अनेक ठिकाणी पी.एफ्.आय.च्या कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. दरभंगा येथील सरचिटणीस महंमद सनाउल्लाहच्या घरीही धाड टाकण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी धर्मांधांच्या जमावाने ईडीच्या अधिकार्‍यांच्या गाडीला घेराव घातला होता, तसेच निदर्शने केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *