Menu Close

धर्माचे आचरण केल्यास अनेक समस्यांवर मात करणे शक्य ! – निरंजन चोडणकर

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे. कोरोनाच्या काळात आपण हस्तांदोलन करू शकत नाही. नमस्कार करणे, ही हिंदु धर्मात सांगितलेली पद्धती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य होती, हे सिद्ध झाले. अशा प्रकारे अनेक समस्यांवर आपण धर्माचरण करून मात करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ऑनलाईन शौर्य जागरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानासाठी २६ जणांची उपस्थित होती. कु. प्रेरणा मठपती हिने सूत्रसंचालन केले.

व्याख्यानानंतर काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. सौ. माधुरी संतोष पलसकर – व्याख्यान ऐकून आत्मविश्‍वास वाढला. आपण देश, धर्म यांसाठी काय करायला हवे, ते नेमकेपणाने समजले.

२. श्रीराम कातवरे – नव्या पिढीने केवळ करियरच्या मागे न लागता, धर्मकार्यातही सहभागी होणे आवश्यक आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *