Menu Close

चीन हवामानात पालट करून भारतात अतीवृष्टी किंवा हिमवृष्टी करण्याच्या प्रयत्नात !

नवी देहली : चीन भारतासह अन्य शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आता नवी योजना आखत आहे. चीन रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करून हवामानात पालट करण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे असा प्रयत्न असणार आहे.

यामुळे शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यासाठी चीन सरकारने अब्जावधी रुपयांची तरतूद केली आहे. या पैशांतून वर्ष २०२५ पर्यंत चीन ५५ लाख चौरस किलोमीटर परिसरातील वातावरणात पालट घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या प्रकल्पाला यश लाभले, तर संपूर्ण पृथ्वीचे निसर्गचक्र बिघडण्याचा धोका आहे, अशी भीती हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *