हिंदूंच्या उत्सवामुळे चंद्रभागेचे प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणाऱ्या प्रशासनाचे वाहनांच्या स्वच्छतेकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथे चैत्री एकादशीचा सोहळा एकीकडे मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात असतांना दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात छोट्या आणि मोठ्या वाहनांची नदीच्या पात्रात स्वच्छता केली जात होती. (या वेळी प्रशासन आणि पोलीस काय करत होते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नदीपात्राच्या कडेला पाणी प्रदूषित न होण्यासाठी न्यायालयाचा आदेश असल्याचा फलक लावण्यात आलेला आहे. तरीही तेथे प्रतिदिन शेकडो पशूंना धुण्यासाठी नदीपात्रात आणले जाते, याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसते. हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये मात्र सातत्याने आडकाठी आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात