विधेयकाला विरोध करत काँग्रेसचा सभात्याग
- काँग्रेसला गोमातेपेक्षा धर्मांधांच्या जिभेचे चोचले पुरवणे अधिक प्रिय आहे. त्यामुळे ती अशा कायद्याला विरोध करते. काँग्रेसने धर्मांधांच्या लांगूलचालनापायी गेल्या ७४ वर्षांत सत्तेत असतांना राज्यांत किंवा केंद्रात गोहत्याबंदी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या !
- गोहत्याबंदीसाठी वर्ष १९६६ मध्ये करपात्री महाराजांनी आणलेल्या साधूंच्या मोर्चावर काँग्रेसनेच गोळीबार करत अनेक साधू आणि गोरक्षक यांना ठार केले होते, हे हिंदू विसरलेले नाहीत !
बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्या बंदी करणारे विधेयक संमत करण्यात आले. या कायद्यानुसार गाय आणि वासरू यांची हत्या अवैध ठरणार आहे. १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या म्हशींची हत्या करण्याची अनुमती यात देण्यात आली आहे.
गोमांसाची विक्री, वाहतूक हाही दंडनीय अपराध असणार आहे. यात एक अपवाद असून जेव्हा गाय आजारी असेल आणि त्याचा संसर्ग अन्य गायींना होणार असेल, तर अशा गायीची हत्या करण्यास अनुमती देण्यात आली आहे. गोहत्येचा आरोप असणार्यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवण्यात येतील, तर गायींच्या सुरक्षेसाठी गोशाळा उघडण्याची यात तरतूद आहे. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. याविषयीवर विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात