रांची (झारखंड) : बंगालमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संहतीचे (हिंदु एकतेचे) नेते श्री. तपन घोष हे मेसरा, रांची येथे रामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात मुख्य अतिथीच्या म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सहस्रो युवक आणि सामान्य धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी हिंदु तरुणांकडून शहरात ठिकठिकाणी पराक्रमी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
श्रीराम सेनेच्या ३६ आखाड्यांचे सहस्रो युवक पारंपरिक शस्त्रास्त्रे चालवतांना पाहून मी खूप प्रभावित झालो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया श्री. तपन घोष यांनी या वेळी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात