Menu Close

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार

मध्यप्रदेश सरकारचा प्रस्तावित लव्ह जिहादविरोधी कायदा

असा कायदा भारतभर होणे हिंदूंना अपेक्षित आहे !

भोपाळ (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमध्ये धार्मिक संघटनेचा सहभाग असेल आणि जर अशा संघटनांना सरकारकडून सुविधा मिळत असतील, तर त्या काढून घेतल्या जातील, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

चर्च, मशीद अथवा मदरसा यांचा सहभाग असल्यास सरकारकडून त्यांना देण्यात आलेली आर्थिक साहाय्य, भूमी आदी काढून घेण्यात येतील. डिसेंबर मासाच्या शेवटपर्यंत हे विधेयक संमत करण्यात येणार आहे.

या कायद्यानुसार आरोपी दोषी ठरला, तर त्याला १० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यात आले असेल, तर हा विवाह रहित केला जाणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *