Menu Close

ब्रिटनमध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

  • ब्रिटनसारखे प्रगत देशही ‘लव्ह जिहाद’च्या छायेखाली !
  • ‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

यॉर्कशायर (ब्रिटन) : येथे लव्ह जिहादची प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी ३२ धर्मांधांवर ८ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ब्रिटनमधील लव्ह जिहादचे हे सर्वांत मोठे प्रकरण आहे. येथे याला ‘ग्रूमिंग जिहाद’ही म्हटले जाते.

किरक्लिस, ब्रॅडफोर्ड आणि वेकफील्ड येथे वर्ष १९९९ ते २०१२ या कालावधीत १३ ते १६ वर्षांच्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. यातील आरोपी हे बॅटले आणि ड्यूसबेरी येथे रहाणारे आहेत. त्यांच्यावर बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण, लहान मुलांची अश्‍लील छायाचित्रे काढणे आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०१८ ते २०१९ या कालावधीत इंग्लंडमध्ये १९ सहस्र मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *