Menu Close

सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमण

पाकमधील असुरक्षित आणि असाहाय्य हिंदू ! त्यांच्याविषयी कुठलाही मानवाधिकार आयोग आवाज उठवत नाही आणि भारतातील हिंदूही मौन बाळगतात !

नवी देहली : पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून पाकच्या सिंधमध्ये हिंदूंच्या घरावर धर्मांधांनी आक्रमण आणि लुटमार केल्याची माहिती दिली.

ऑस्टिन यांनी सांगितले की, महंमद अस्लम नावाच्या व्यक्तीने त्याच्या शेजारी रहाणार्‍या लोकांना एकत्र करत तेथील गरीब हिंदूंवर अत्याचार करत त्यांना घर सोडून जाण्यास बाध्य केले. हे हिंदू घाबरलेले आहेत. त्यांनी याविषयी सत्र न्यायालय आणि पोलीस यांच्याकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओमध्ये हिंदू त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात घोषणाबाजी करतांना दिसत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *