न्यायालयाच्या आदेशानंतरही अन्य धर्मियांच्या अवैध प्रार्थनास्थळांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या मंदिरांवर मात्र अनुमती नसतांनाही कारवाई करते, हे हिंदूंना लज्जास्पद !
अनुमतीविना कारवाई करणार्यांवर शासनाने कारवाई करावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, ही हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
आदिवासींनी वनकर्मचार्यांना चोपले
जळगाव : येथील सातपुडा पर्वतातील मोहरद शिवारात आदिवासी बांधवांनी बांधलेले हनुमान मंदिर वनकर्मचारी के.आर्. साळुंखे यांनी वनविभागाची अनुमती न घेता कर्मचार्यांसह पाडले. (हिंदूंनो, तुम्ही असंघटित असल्यानेच मंदिर पाडण्याच्या अशा घटना वारंवार घडत आहेत, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी ३०० ते ५००च्या जमावाने आलेल्या आदिवासींनी वनकर्मचार्यांना चोपले. वनकर्मचारी मंदिर पाडत असतांना काही भाविक रडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (भाविकांनो, रडण्यापेक्षा लढल्यासच मंदिराचे रक्षण होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्याचे काय होणार, असा प्रश्न भाविकांसमोर आहे.
वनाधिकारी काझी यांचा उद्दामपणा !
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि वनविभाग अधिकारी काझी यांच्यात पुष्कळ वाद झाला. काझी संतप्त आणि आक्रमक झाले होते. कोण माझे काय वाकडे करणार आहे, असे ते संघाच्या कार्यकर्त्यांना म्हणाले. (अशा उद्दामांवर शासन कारवाई करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात