भारतातील राजकीय नेतेही कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे सर्रास उल्लंघन उल्लंघन करत असतांना त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस कुठलेही प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !
सेंटियागो (चिली) : दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशाचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा यांनी विना मास्क महिलेसमवेत समुद्रकिनार्यावर सेल्फी काढल्याने त्यांना २ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड भरावा लागला.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणार्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना हा दंड भरावा लागला आहे. मास्क आणि सामाजिक अंतर दोघांचेही त्यांनी पालन केले नाही. राष्ट्रपती पिनेरा यांनी या प्रकरणी सर्वांची क्षमा मागितली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात