इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !
उज्जैन (मध्यप्रदेश) : येथील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या विस्ताराचे काम चालू असतांना येथील उत्खननात १ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर नक्षीकाम केलेले आहे. याची माहिती मिळताच पुरातत्व विभागासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
पुरातत्व विभागाचे अधिकारी रमण सोलंकी यांनी सांगितलं की, अशाप्रकारचे अवशेष आम्हाला पहिल्यांदाच सापडले असून याप्रकारची रचना आम्ही कधीही पाहिली नाही. जेव्हा आम्ही पूर्ण खोदकाम करू तेव्हाच आम्हाला या मंदिराचा आकार कळू शकेल. हे सर्व अवशेष इल्तुतमिशच्या आक्रमणाच्या वेळेचे असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. याठिकाणी मंदिर पाडून त्याठिकाणी भराव घातल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे मंदिर परमार राजवटीच्या काळातील असून ते १ सहस्र वर्ष जुने आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात