बांगलादेशात एका हिंदु अधिवक्त्याची अशी स्थिती, तर तेथील सर्वसाधारण हिंदूंच्या व्यथेचा विचारच न केलेला बरा !
इस्लामी बांगलादेशातील न्यायालयाकडून हिंदु आरोपीला सापत्नपणाची वागणूक
ढाका : बांगलादेश उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपिठाचे न्यायमूर्ती महंमद रुहुल कुद्दस यांनी हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढणार्या बांगलादेशी मायनॉरेटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना न्यायालयात चेतावणी देण्याचा प्रकार ११ एप्रिल या दिवशी घडला. अधिवक्ता घोष यांनी एका आर्थिक प्रकरणात असलेल्या हिंदु आरोपी नारायण चंद्र पॉल यांच्या वतीने खंडपिठासमोर अर्ज दाखल केला होता.
नारायण चंद्र पॉल यांना इतर ३ मुसलमान आरोपींसह एका खटल्याच्या प्रकरणी कारावास ठोठावण्यात आला होता. एकाच आरोपाखाली कारागृहात असलेल्या ४ आरोपींपैकी मुसलमान असलेल्या ३ आरोपींची उच्च न्यायालयाने जानेवारी मासात निर्दोष मुक्तता केली; मात्र नारायण चंद्र पॉल या हिंदु आरोपीची मुक्तता केली नाही.
अल्पसंख्यांक आरोपीची समान न्यायदानाच्या आधारे निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल भेदभाव करणारा असल्याचे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी न्यायाधीशांना लक्षात आणून दिला. भेदभाव हा शब्द ऐकताच क्रोधित होऊन न्यायमूर्ती महंमद रुहुल कुद्दस यांनी अधिवक्ता घोष यांच्याच विरोधात बार कौन्सिलकडे तक्रार करण्याची चेतावणी दिली.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात