मुंबई : २१ डिसेंबर या दिवशी तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून वध केला होता. ‘आतंकवाद कसा नष्ट करावा’ याचा आदर्शच त्यांनी हिंदूंना घालून दिला होता. या अनुषंभाने धर्मप्रेमींनी ट्विटरवर #ShivPratapDin हा हॅशटॅग ट्रेंड केला होता.
काही काळातच तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या स्थानावर होता. यावर ३० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. यात धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात