Menu Close

पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला ब्रिटनमधे २० लाखांचा दंड

ब्रिटनमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ‘ऑफकॉम’कडून कारवाई

  • ब्रिटनमधील ‘ऑफकॉम’ला पाकपुरस्कृत आतंकवाद दिसत नाही कि ती पाकची बटीक असणारी संस्था आहे ?, असा प्रश्‍न भारतियांना पडणारच !
  • पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेत एका वृत्तवाहिनीवर कारवाई होते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही त्याविषयी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही, हे लक्षात घ्या ! ही स्थिती हिंदूसंघटनाचे महत्त्व अधोरेखित करते !

नवी देहली : ब्रिटनमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ‘ऑफकॉम’ने ‘वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क’ला पाकिस्तानी नागरिकांना ‘आतंकवादी’ असल्याची द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी २० सहस्र पौंड (१९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. ‘वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क’कडे ब्रिटनमधील ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीचे दायित्व आहे. अर्णव गोस्वामी हे ‘रिपब्लिक भारत’चे संपादक आहेत. ‘ऑफकॉम’ने या वाहिनीला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याची सूचना केली आहे.

१. रिपब्लिक भारतच्या ६ डिसेंबरला प्रसारित झालेल्या ‘पूंछता है भारत’ या कार्यक्रमात ही भाषा वापरण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

२. ‘ऑफकॉम’ने दिलेल्या माहितीनुसार अर्णव गोस्वामी यांनी भारताच्या ‘चंद्रयान २’ मोहिमेच्या संदर्भात कार्यक्रम करतांना भारताच्या अवकाश आणि तंत्रज्ञान विकास यांची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाककडून भारताविरोधात होणार्‍या आतंकवादी कारवायांचाही त्यात उल्लेख होता.

३. या कार्यक्रमात अर्णव गोस्वामी आणि सहभागी पाहुणे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणार्‍या होत्या. या कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख आतंकवादी, माकडे, गाढवे, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचेही ऑफकॉमने सांगितले.

४. पाकचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते सर्वजण आतंकवादी आहेत. त्यांचे खेळाडू, प्रत्येक लहान मूल आतंकवादी आहे. तुम्ही आतंकवाद्यांविरोधात लढत आहात, असे अर्णव गोस्वामी यांनी कार्यक्रमात म्हटले होते, असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *